Tuesday, July 12, 2011

कुसुमाग्रज















सर्वात्मका सर्वेश्वरा 

गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता 
अनुदारिता दुरिता हरा ॥
सर्वात्मका सर्वेश्वरा॥
गीत - वि. वा. शिरवाडकर 
संगीत - पं. जितेन्द्र अभिषेकी 

स्वर - पं. जितेन्द्र अभिषेकी 

नाटक - ययाति आणि देवयानी (१९६६)
===============================================
सर्वात्मका शिवसुंदरा

सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ।

तिमिरातुनी तेजाकडे
प्रभु आमुच्या ने जीवना ॥


सुमनात तू गगनात तू 
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्‌धर्म जे जगतामधे
सर्वांत त्या वसतोस तू 
चोहीकडे रुपे तुझी 
जाणीव ही माझ्या मना ॥1॥


श्रमतोस तू शेतांमधे 
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले वा गांजले 
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे 
तेथे तुझे पद पावना ॥2॥


न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमि चालती
तू दीप त्यांच्या अंतरी 
ज्ञानार्थ जे तपती मुनी
होतोस त्यांची साधना॥3॥


करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले 
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पावले
सुजनत्व या हृदयामधे
नित जागवी भीतीविना ॥4॥


~ कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment