Wednesday, October 26, 2011

God Speak to Me.


God Speak to Me.
Man whispered, “God, speak to me” and a meadowlark sang.
But the man did not hear.
So the man yelled “God, speak to me” and the thunder rolled across the sky.
But the man did not listen.
The man looked around and said, “God, let me see you” and a star shined brightly.
But the man did not see.
And, the man shouted, “God, show me a miracle” and a life was born.
But the man did not notice.
So the man cried out in despair, “Touch me God, and let me know you are here”. Whereupon, God reached down and touched the man.
But the man brushed the butterfly away and walked on….

Monday, October 17, 2011

जगजीत सिंग- निदा फाझली


तुम ये कैसे जुदा हो गए...हर तरफ,हर जगह हो गए.
(16-10-2011 : 14:33:19)  LOKMAT


काही वर्षापूर्वी जगजीतचा तरुण मुलगा अकालीच हे जग सोडून गेला.पण त्याच्या खोलीत,
आपल्या गाण्यात, आपल्या शैलीत आणि आवाजात त्यानं मुलाला चिरंतन ठेवलं.

जगजीतही आज आपल्यात नाही;पण त्याची आठवणही अशीच चिरंतन राहील.

त्याच्या आवाजात. त्याच्या गझलेत.
जगजीत सिंग आणि माङया मैत्रीचं वय तेवढंच आहे, जितके माङया.

दुनिया जिसे कहते है, बच्चों का खिलौना है।
मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है।


या गझलेचे!

कोणत्या तरी एका मैफिलीत जगजीत सिंगने ही गझल म्हटली होती. नंतर ती चित्र सिंगसोबतच्या युगुलगीताच्या रूपात रेकॉर्डही झाली. मला त्याची गंधवार्ताही नव्हती. आणि असणार तरी कशी? माझा ना ठावठिकाणा होता, ना कुठला पत्ता. मला या रेकॉर्ड प्रकरणाची बातमी तेव्हा कळाली, जेव्हा एचएमव्हीचा धनादेश खूप फिरून-फिरून माङया हातात पडला. जगजीतच्या ‘कम अलाइव्ह’ या अल्बममध्ये ही गझल आहे. लंडनच्या एका मैफलीत त्याने ‘लाइव्ह’ गायली होती. तशीच ती अल्बममध्ये आली.

या अल्बमची सुरुवात जगजीतच्या आवाजातील काही किश्श्यांनी होते. त्यात एक वाक्य असेही सामील आहे, आजच्या सायंकाळची सुरुवात आम्ही निदा फाझली यांच्या गझलेने करीत आहोत.

या अल्बममध्ये माङयाशिवाय इतरही अनेक शायरांच्या गझला आहेत; पण जगजीतने फक्त माङो नाव घेतले होते. या एका गोष्टीने चांगल्या-वाईट सर्व गझलांची बदनामी आणि नेकनामी माङया खात्यावर जमा झाली. पाकिस्तानचे प्रसिद्ध शायर अब्दुल हमीद अदम यांचा एक शेर आहे -

दिल अभी अच्छी तरह टूटा नही
दोस्तों की मेहरबानी चाहिए़

असो. गायकी आणि गझलेचे नाते तसे तर खूप जुने आह़े बेगम अख्तर, मेहदी हसन यांचा काळ सुवर्णकाळ होता़ मेहदी हसन यांच्या लयकारीने गझलगायकीला अशी काही शोभा आणली, की ‘गझल’ गायनातील एक अतुट अंग बनली़ चित्रपटगीतातील शब्दांचा अनादर असलेलेही गझलेच्या आदराचे कारण झाल़े नटलेल्या ड्रॉइंगरूमपासून पंचतारांकित हॉटेलांर्पयत मोठमोठय़ा मैफलीत गझलेचा आवाज ऐकू येऊ लागला. सुरेल गायकी, रागांवर आधारित चाली आणि सुंदर निवड यामुळे लवकरच मेहदी हसन एक युगनिर्माता झाल़े गझलगायकीची एक शाळा बनूनच ते आले आणि भारत-पाकिस्तानातील नवे-नवे गायक त्या शाळेला जोडले गेल़े बघता बघता गझल गाणा:यांची संख्या वाढत गेली़ गझलेच्या लोकप्रियतेने कव्वालीच्या संस्कृतीला मागे ढकलून दिल़े मोठमोठे कव्वाल एकतर घरी रिकामे बसले किंवा काहींनी गझलेला आपलेसे करणोच योग्य आहे, असे ठरविल़े

गझल हा एक काव्यप्रकार आह़े प्राचीन भारताच्या इतिहासात तिच्या पाऊलखुणा सापडतात; परंतु हिंदुस्तानी भाषेत (हिंदी-उर्दूमिश्रित) दिल्लीमध्ये तिचा चेहरा दिसतो़ जिथे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात सूफी संत निजामुद्दीन यांचे अंगण तिच्यासाठी होत़े हिंदुस्तानी भाषेतील त्यांची पहिली गझल या नावाशी जोडली आह़े त्याचा मतला (मुखडा, पहिला शेर) असा आहे -

जो यार देखा नैन भर, दिल की गयी चिंता उतर
ऐसा नही कोई अजब, राखे उसे समझाए कर


हा काव्यप्रकार कितीतरी देशांतून, संस्कृतीतून भारतात आला़ त्यामुळे एकाच वेळी हा प्रकार सूफी आहे, प्रेमिकांचा आहे आणि नशा आणणारा आह़े हा प्रकार अधर्मी नाहीच; पण त्याचा धर्म मुल्ला-पंडितांच्या वतरुळाच्या बाहेर पडून जमीन-आकाशाच्या संबंधाला शोधत आह़े

जगजीत सिंग त्या बहुरंगी-बहुढंगी प्रकाराचे प्रमुख गायक होत़ राजस्थानमधील श्रीगंगानगरचे उस्ताद जमाल सेन यांच्याकडून संगीताचे धडे आणि जालंधरमधील महाविद्यालयातून शिक्षण घेऊन ते मुंबईत आले होत़े संगीताशी त्यांची मैत्री 1948च्या आसपास झाली़ तेव्हा ते घरात रेडिओवरून संगीत ऐकत आणि गुणगुणत राहत़ त्यांचे वडील सरदार अमरसिंग यांनी त्यांना एकदा पकडल़े सात भाऊ-बहिणींच्या परिवारातील संसाराच्या काही जबाबदा:यांमुळे तारुण्यात सोडलेले एक स्वप्न सरदार अमरसिंगांनी पुन्हा एकदा पाहिल़े आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते जगजीतला अंध शिक्षक पंडित छगनलाल शर्मा यांच्याकडे घेऊन गेल़े तेव्हा जगजीत 12 वर्षाचा होता़ त्यानंतर जगजीतने उस्ताद जमाल खान यांच्याकडे शिष्यत्वाचा गंडा बांधला़

गुरु-शिष्यांची ही परंपरा जाऊन पोहोचते ती तानसेनर्पयत. मी ज्या गावातून आलो, त्या गावात चिंचेच्या एका झाडाखाली तानसेनजींची समाधी आहे. माङो तानसेनशी नाते असेही आहेच. जगजीतसोबत माझी मैत्री गझलांपलीकडे अशीही आहे. या भूमिकेला इन्कार करण्यात अर्थ नाही.

जगजीत सिंग हे जगजीतचे दुसरे नाव आहे. त्यांचे वडिलांनी ठेवलेले नाव होते जगमोहन. बरेच र्वष ते नाव होते. पण एकदा त्यांच्या परिवाराचे गुरू आले आणि त्यांच्या आदेशानुसार जगमोहन ‘जगजीत सिंग’ झाला. नाव बदलण्याबरोबर त्या गुरूने भविष्यवाणी केली, हा मुलगा एक दिवस जग जिंकेल आणि लवकरच या भविष्यवाणीचा चमत्कार समोर आला. जगजीत तेव्हा नववीत होते. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. 15-2क् ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांमध्ये जगजीतने पंजाबी गीत म्हटले- की तेरा एतिबार ओर राहिया

सगळी मैफल बेधुंद झाली. त्या व्यासपीठावरून त्यांना आणखी काही गाणी गावीच लागली. नावावरून नशिबाला जोडण्याची फॅशन चित्रसृष्टीत नेहमीच बघायला मिळते. कधी कधी ते खरेही ठरले आहे. युसूफखानचे दिलीपकुमार झाले आणि इंदूरचा बद्रुद्दिन जॉनी वॉकर झाले. ते याच नावाने जिथे जिथे गेले, तिथे यश सोबत आले. नावही कमावले गेले. माझी एक द्विपदी (शेर) आहे -

कोशिश भी कर, उम्मीद भी रख, रास्ता भी चुन
फिर उसके बाद थोडा मुकद्दर तलाश कर


हेच खरे आहे. नुसते नाव बदलून काही होत नाही. प्रयत्न करावे लागतात, आशा जिवंत ठेवावी लागते आणि वाट निवडावी लागते. जगजीतनेसुद्धा केवळ भविष्यवाणीवर भिस्त ठेवली नाही. स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्नही केले. त्याची सकाळ तानपु:यासोबत उजाडत असे आणि रात्रदेखील रागांचा अभ्यास करीत झोपत असे. या सकाळ-रात्रीच्या दरम्यान त्याची जीवनकथा नवनवे रंग बदलत राहिली.

त्याच्या संगीतजीवनाची सुरुवात तलत मेहमूद व मेहदी हसन यांनी गायलेलया गझला पुन्हा गाऊन झाली. जगजीत मुंबईत आला तेव्हा चेह:यावर दाढी आणि डोक्यावर पगडी होती. त्याचा पहिला अल्बम आला आणि दाढी-पगडी गेली. त्याची लोकप्रियता पाहून जेव्हा एचएमव्हीने कॅसेटच्या कव्हरवर छापायला फोटो मागितला, तेव्हा त्याच्या चेह:याची दाढीतून आणि डोक्याची पगडीतून सुटका झाली. दाढी-पगडीविना त्याचा चेहरा पाहून ख्यातनाम पत्रकार खुशवंतसिंगांना त्यात दिलीपकुमारची छबी दिसली होती.

असे म्हणतात, की प्रसिद्ध व्यक्तींच्या मागे एक स्त्री असते. इतरांबाबत ते खरे असो वा नसो; पण जगजीतच्या राहण्या व टापटिपीबाबत, त्याच्या रेकॉर्डच्या इंग्रजी नावांबाबत आणि व्यासपीठावरील सहभागार्पयत चित्र सिंगनेही आपली भूमिका जाणीवपूर्वक वठविली आहे. जगजीतची ‘इमेज’ बनविण्यात तिचा वाटा मोठा आहे.

चित्रचे नाव जगजीतबरोबर जोडण्यापूर्वी ‘दत्ता’ या नावाशी जोडलेले होते. दत्तांशी मतभेद होऊन चित्र एकटी झाली होती. जगजीत सिंग तिच्या एकाकीपणाची सोबत झाला.

जगजीतने माझी एक गझल गायली आहे. त्याची पहिली द्विपदी (शेर) अशी आहे -

अपनी मर्जी से कहां अपने सफर के हम है
रुख हवाओं का जिधर है, उधर के हम है


ही गझल ‘सैलाब’ नावाच्या मालिकेत जगजीतच्या आवाजामध्येच आहे. नंतर तिचा ‘मिराज’ या कॅसेटमध्ये समावेश झाला.
मुलांचा एक खेळ आहे, सापशिडी. ज्यात एका फाशाने हार-जीत होत असते. फासा कितीतरी वेळा शिडी चढतो अन् अचानक सापाच्या कलाकारीने त्याला दंश होतो.
जगजीतसुद्धा चित्रसोबत कितीतरी शिडय़ा चढला. ते जिथे गेले, तिथे अजून पुढे जात राहिले; पण फासा तर निसर्गाच्या हातात होता.

जगजीतने माङो एक गीत गायले आहे-

जीवन क्या है चलता फिरता एक खिलौना है
दो आंखो में एकसे हँसना, एकसे रोना है


जगजीतचे व्यक्तिमत्त्वसुद्धा हसण्या-रडण्याच्या मीलनाचा नमुना होता. त्याच्या ‘पुष्पव्हिला’ या घरातील एक खोली बंद आहे. ती खोली पूर्वी कित्येक र्वष बंद होती, तशीच आजसुद्धा आहे. रोज सकाळी नियमितपणो ती उघडते आणि अगरबत्तीच्या सुगंधाने भरून जाते.

त्या खोलीतील प्रत्येक वस्तू तशीच आहे, जशी कित्येक वर्षाआधी त्याचा एकुलता मुलगा विवेक सोडून गेला होता आणि पुन्हा आला नव्हता.

विवेकच्या मृत्यूचा प्रसंग मला आठवतो. विवेकचा मृतदेह समोर होता. मी जगजीतच्या खांद्यावर सांत्वनासाठी हात ठेवला. जगजीत म्हणाला, ‘जन्म-मृत्यू हे अपरिहार्य आहेत रे. मृत्यू कधी तरी येणार हे सत्यच आहे. पण विवेकच्या जाण्याने मला हे जीवन उद्देशहीन (बेमकसद) वाटू लागले आहे.’

देवाने विवेकला भले जगजीतपासून हिरावून घेतले असेल; पण जगजीतने विवेकला आजर्पयत जिवंत ठेवले होते. त्या खोलीत, आपल्या गाण्यात, आपल्या शैलीत, आपल्या आवाजातही..

तुम ये कैसे जुदा हो गए
हर तरफ हर जगह हो गए


आज जगजीतसुद्धा आठवण बनून जिवंत आहे. आपल्या आवाजात.. शब्दांच्या आपल्या शैलीत..
- निदा फाझली