Monday, August 15, 2011

संस्कृत सुभाषित

मणिना वलयं वलयेन मणिर्मणिना वलयेन विभाति कर: ।
कविना च विभुर्विभुना च कवि: कविना विभुना च विभाति सभा ॥
शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभः ॥।
पयसा कमलं कमलेन पयः पयसा कमलेन विभाति सरः ॥॥
अर्थ:-
रत्नामुळे कडे, कड्यामुळे रत्न, रत्न आणि कडे ह्या दोहींमुळे हात शोभून दिसतो.
कवीमुळे राजा, राजामुळे कवि, कवि आणि राजा ह्या दोहींमुळे राजसभा शोभून दिसते.
शशी (चंद्र) मुळे रात्र(निशा), रात्रीमुळे चंद्र, तर चंद्र व रात्री मुळे हे आकाश(नभ) शोभून दिसते.
पाण्यामुळे (पय) कमळ, कमळामुळे पाणी, तर पाणी व कमळामुळे हे सरोवर (सर) शोभून दिसते.



1 comment:

  1. Casinos in Dallas, Dallas and WV | Mapyro
    Find the best casinos in Dallas, Dallas 평택 출장안마 and 충청북도 출장마사지 WV, with information 평택 출장샵 about slots, table 남원 출장마사지 games, restaurants & more 용인 출장안마 nearby Dallas, WV, Dallas

    ReplyDelete