आरती प्रभू
ज्येष्ठ मराठी लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ कवी आरती प्रभू यांचा २६ एप्रिल हा स्मृतिदिन.
|
|
|
|
कवी आरती प्रभू किंवा लेखक चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांच्या
उल्लेखाशिवाय मराठी साहित्याचा अभ्यास पूर्णच होऊ शकत नाही.
चिं. त्र्य. खानोलकर यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळमध्ये झाला. वडिलांचे छत्र लहानपणीच गेल्यावर आई हेच त्यांचे सर्वस्व झाले होते.
आरती प्रभूंचे शिक्षण फारसे झाले नव्हते. बेफिकीरप्रवृत्ती आणि धंद्यातील स्पर्धा यामुळे त्यांचा खाणावळीचा धंदा बसला. देणेक-यांची देणी वाढली. घरातील एकेक वस्तू विकून दिवस कंठण्याची वेळ आली. अशा आर्थिक ओढगस्तीमुळे खानोलकर त्रस्त झाले होते. शाळेत असल्यापासून खानोलकर आरती प्रभू या नावाने कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. खानोलकरांनी आपली हालाखीची स्थिती मधू मंगेश कर्णिकांना कळवली आणि एक दिवस अचानकपणे ते मुंबईत येऊन दाखल झाले.
कोकणात निसर्गाच्या सानिध्यात राहणारे खानोलकर मुंबईत मनापासून कधीच रमले नाहीत. त्यांच्यातील कवी निसर्गात आकंठपणे बुडालेला होता. त्यामुळे त्यांच्या बहुतेक सर्व कवितांमध्ये निसर्गच चित्रित केलेला दिसतो. अशा त्यांच्या या कवितांचा कवितासंग्रह जोगवा मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. याच दरम्यान त्यांची आकाशवाणीतील भाषण विभागात पाडगावकरांचा असिस्टंट म्हणून नेमणूक केली.
खानोलकरांचा जीवनपट म्हणजे नियतीचा सारीपटच होता असे म्हणावे लागेल. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात , असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला. श्री. पु. भागवत , मंगेश पाडगांवकर , मधु मंगेश कर्णिक , विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे येतात आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ ये रे घना ’, ‘ नाही कशी म्हणू तुला ’ सारखी गीते अमर होतात.
सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा हा माणूस ‘ रात्र काळी घागर काळी ’ सारखी कादंबरी लिहितो आणि हरी नारायण आपटे अभ्यासवृत्ती मिळवतो. ‘ अजगर ’सारख्या कादंबरीवर अत्र्यांसारख्याचे आसूड खातो. पुढे ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला अंत्र्याकडून शाबासकीही मिळवतो. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘ एक शून्य बाजीराव ’ सारखे नाटक लिहितो आणि रंगायनसारखी संस्था ते रंगभूमीवर आणते. एक इतिहास घडतो. ‘अवध्य ’ सारख्या नाटकातून रंगभूमी गाजवतो आणि मराठी नाटक वयात आल्याची ग्वाही माधव मनोहरांसारखा व्यासंगी समीक्षक मुक्तमनाने देतो. कोंडूरा कादंबरीचा अजब विषय सत्यजित रे सारख्या जागतिक कीर्तीच्या चित्रसम्राटाला टाकवून टाकतो आणि त्यावर चित्रपट काढावा असे त्याला वाटते. व्ही. शांतारामासारख्यांना चानी मोहात टाकते. अजब न्याय वर्तुळाचा जर्मनीपर्यंत पोहचते आणि नाट्यसृष्टीत एक चमत्कार घडतो.
८ मार्च १९३० रोजी कोकणच्या भूमीवर अवतरलेले नियतीच्या पटावरचे हे प्यादे २६ एप्रिल १९७६ पर्यंत अनेक चौकोनातून फिरत वेगवेगळ्या चालीने संचार करीत अखेर नियतीने पटाबाहेर नेले.
- अमिता जामखेडकर
(पुनर्मुद्रीत) |
|
|
|
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (८ मार्च, इ.स. १९३०- २६ एप्रिल, इ.स. १९७६)
मराठी कवी, लेखक होते. कोकणातल्या कोण्या एका गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत.
तेथे गल्ल्यावर बसुन खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्या काही
मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने
'मौज' मधे छापण्यास पाठवुन दिल्या. मौज' च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित
झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली. ये रे घना
ये रे घना
न्हावूं घाल
माझ्या मना ... खानोलकरांना भीती होती कि अचानक मिळालेल्या या प्रसिध्दीमुळे आपली प्रतिभा,
आपल्याला मिळालेली शब्दांची हि देणगी आपल्या हातुन निसटुन तर जाणार नाहीना.
पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधना पर्यंत मराठी
साहित्य सॄष्टीत तळपतच राहिला. प्रकाशित साहित्य
- गणूराय आणि चानी (कादंबरी, १९७०)
- कोंडुरा (कादंबरी, १९६६)
- अजगर (कादंबरी, १९६५)
- रात्र काळी, घागर काळी (कादंबरी, १९६२)
- त्रिशंकू (कादंबरी, १९६८)
- आपुले मरण
- जोगवा (काव्यसंग्रह, १९५९)
- दिवेलागण (काव्यसंग्रह, १९६२)
- नक्षत्रांचे देणे ((काव्यसंग्रह, १९७५)
- पिशाच्च ((कादंबरी, १९७०)
- पाषाण पालवी ((कादंबरी, १९७६)
- सनई (कथा संग्रह, १९६४)
- राखी पाखरू (कथा संग्रह, १९७१)
- चाफा आणि देवाची आई (कथा संग्रह, १९७५)
- एक शुन्य बाजिराव (नाटक, १९६६)
- सगेसोयरे (नाटक, १९६७)
- अवध्य (नाटक, १९७२)
- कालाय तस्मै नमः (नाटक १९७२)
- अजब न्याय वर्तुळाचा (नाटक, १९७४)
पुरस्कार
१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार "नक्षत्रांचे देणे " साठी
अंत झाला अस्ता आधी,जन्म एक व्याधि
वेदानांचे गाणे म्हणजे पोकळं समाधि
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौताम्य हे त्याच्या गळी साजे
कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
दीप सारे जाती येथे विरून विझूनं
वृक्ष जाती अन्धारात गोठुन झडून
जिवानाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
कशासाठी उतरावे तम्बू ठोकुन
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगातात येथे कुणी मनात कुजुन
तरी कसे फुलंतात गुलाब हे ताजे
कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
कुणाच्या खान्द्यावरं कुणाचे ओझे ?
~आरती प्रभू
|
कवितासागर साहित्य अकादमी KavitaSagar Sahitya Akademi
ReplyDeleteडॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, मायस्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र
वार्षिक सभासदत्वासाठी अर्ज: एप्रिल 01, 2014 - मार्च 31, 2015 An application for the annual membership: April 01, 2014 - March 31, 2015
आपणांस लागू पडणा-या खालील प्रकारावर (√) अशी खुण करावी. (आवश्यकता भासल्यास एका पेक्षा अधिक प्रकारावर खुण करता येईल.)
[ ] लेखक [ ] कवी [ ] अनुवादक [ ] पत्रकार [ ] संपादक [ ] प्रकाशक [ ] नाटककार [ ] विनोदी लेखक [ ] कादंबरीकार [ ] कथाकार [ ] निबंधकार [ ] इतिहास संशोधक [ ] समीक्षक [ ]__________
नाव Name
शिक्षण Education
पत्ता Address
दूरध्वनी Telephone
मोबाईल Mobile
ई - मेल E-mail
वय / जन्मतारीख Age / Date of Birth
व्यवसाय Profession
छंद Hobbies
o माझ्या सर्व प्रकाशित साहित्याची एक - एक प्रत विनामूल्य अकादमीकडे सादर करेन. कवितासागर साहित्य अकादमीची वार्षिक वर्गणी रुपये _____ सोबत Money Order / Demand Draft द्वारा “कवितासागर” या नावाने पाठवीत आहे, तसेच माझे दोन छायाचित्र अर्जासोबत देत आहे. कृपया मला अकादमीचे वार्षिक सभासदत्व देण्यात यावे हि विनंती.
o वार्षिक सभासद शुल्क: [ ] विद्यार्थी - 325/- [ ] व्यक्ती - 375/- [ ] संस्था - 1200/-
स्वाक्षरी Signature ______________ दिनांक Date ___________ ठिकाण Place _____________
दूरध्वनी: ०२३२२ - २२५५००, ९९७५८७३५६९, sunildadapatil@gmail.com, sabdainindia@gmail.com
आम्ही आपल्यासाठी हे करू...
• कवितासागर प्रकाशनामार्फत प्रसिद्ध सर्व मासिके / पुस्तकावर 10% विशेष सवलत देण्यात येईल.
• आपला प्रवेश अर्ज व वार्षिक सभासद शुल्क प्राप्त झाल्यानंतर लगेचच सभासद प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
• कवितासागर द्वारा आयोजित व प्रायोजित कवी संमेलनामधून आपले साहित्य सादर करण्यासाठी प्राधान्य.
• विविध साहित्यिक व सामाजिक संस्था यांच्या द्वारा आयोजित साहित्यिक उपक्रमांची माहिती, साहित्यिक स्पर्धा, संमेलने, मेळावे, कार्यशाळा साहित्यिक शिष्यवृत्ती, साहित्यिक मानधन आणि साहित्यिक पुरस्कार यांची माहिती अकादमीच्या सर्व सभासदांना वेळो - वेळी देण्यात येईल.
• कवितासागर प्रकाशना अंतर्गत विविध योजना व उपक्रमामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य देण्यात येईल.
• अकादमीशी सलग्न विविध मासिके / दिवाळी अंकामधून अकादमीच्या सभासदांना साहित्य प्रसिद्धीसाठी प्राधान्य.
• अकादमीच्या सभासदांच्या पुस्तक प्रकाशन, परीक्षण आणि प्रदर्शनासाठी मार्गदर्शन.
• कवितासागर प्रकाशनामार्फत पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमीच्या सभासदांची प्रसिद्ध झालेली पुस्तके ई-बुक स्वरुपात तयार करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या नवीन पुस्तकांची ISBN नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या नवीन पुस्तकांची कॉपी राईट नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व प्राधान्य.
• सभासदांच्या पुस्तकांची परीक्षणे / पुस्तक परिचय विविध नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी मार्गदर्शन.
• अकादमीचे मुखपत्र "कवितासागर" च्या वार्षिक वर्गणीवर अकादमीच्या सभासदांना 10% विशेष सवलत.
• अकादमीच्या सभासदांना आपल्या परिसरात साहित्यिक मेळावा, कार्यशाळा, कवी / साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन केले जाईल.
• अकादमीच्या सभासदांना अल्प देणगीमूल्यात ग्रंथालयाची सोय; बाहेरगावच्या सभासदांना टपालाद्वारे पुस्तके पाठविली जातात.
• अकादमीच्या सभासदांचा साहित्यिक परिचय "कवितासागर" नियतकालिकामधून प्रसिद्ध करण्यासाठी प्राधान्य.
• सभासदांना अकादमी द्वारा निर्मित व वितरीत सर्व ई-बुक्स संपूर्णपणे मोफत दिली जातील.
• अकादमीच्या ई-लायब्ररी मध्ये असलेल्या ई-पुस्तकांचा व ई-नियतकालिकांचा सभासदांना संपूर्णपणे मोफत लाभ घेता येईल.
• ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या किंवा मागील वर्षापासून सातत्यपूर्ण समाज प्रबोधनपर, समाजोपयोगी व सकस लिखाण करणा-या साहित्यिकांना अकादमीच्या वतीने दिल्या जाणा-या दरमहा मानधन योजनेसाठी अकादमीच्या सभासदांकडून आलेल्या प्रस्ताव अर्जांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा दिल्या जाणा-या विविध साहित्य व सामाजिक पुरस्कारांसाठी अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा आयोजित पुस्तक वितरण व पुस्तक प्रदर्शनामध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
• अकादमी द्वारा निर्मित विविध साहित्यिक सूची व ग्रंथ सूची मध्ये अकादमीच्या सभासदांना प्राधान्य.
आयुष्याला कलाटणी देणारे एक क्रांतिकारी पुस्तक...
ReplyDeleteमी गरीब का आहे?
या क्रांतिकारी पुस्तकाच्या माध्यमातून “गरीबी” हा विषय लेखक - राज धुदाट यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. गरीबीची कारणे त्यांनी समर्पकपणे सांगितली आहेत, त्याचं बरोबर गरीबीमधून बाहेर पडण्यासाठी असलेले पर्याय सुद्धा त्यांनी सुचवलेले आहेत / दिलेले आहेत.
मी गरीब घराण्यात जन्माला आलो म्हणून मी आयुष्यभर गरीबचं राहावं असे कुठे लिहिले आहे काय? किंवा असा काही नियम आहे काय? प्रत्येकाला आपल्या गरीबीवर नैतिक मार्गाने मात करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी तर असे म्हणेन आपल्या आवश्यक गरजा भागवण्यासाठी लागणारी श्रीमंती आमच्या प्रत्येकाला मिळायलाचं हवी आणि किंबहुना तो आमचा जन्मसिध्द अधिकारच आहे. जरी गरीब घरात जन्मास येऊन तो अधिकार आमच्या पासून दूर गेला असेल तरी, अहिंसा व सत्याच्या मार्गाने आम्ही तो अवश्य प्राप्त करू शकतो. आमची गरीबी दूर करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे ऐवढे मात्र खरे. गरीबीवर मात केलेल्यांची अनेक उदाहरणे देता येतील; धीरुबाई अंबानी एकेकाळी पेट्रोल पंपावर किरकोळ स्वरूपाचे काम करीत होते, कारण त्यांचा जन्म एका गरीब परिवारात झाला होता, पण त्यांनी गरीबीशी संघर्ष करून ते देशातील अतिश्रीमंत व्यक्तीपैकी एक बनले.
माणसाचे नशीब एक टक्का काम करते आणि नव्यानव टक्के आपली कर्तबगारी काम करते. मी गरीब आहे म्हणून घरातचं बसलो किंवा रोजंदारीचं करीत बसलो तर गरीबीतून बाहेर पडताचं येणार नाही. याचा अर्थ रोजंदारी करणा-यांनी रोजंदारीचं करू नये असा नसून आपल्या दैनंदिन कामातूनचं गरीबीच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा.
बेडूक एखाद्या डबक्यात रहात असतो, त्याला वाटते की आपण समुद्रातच रहात आहोत आणि हेच आपले विश्व आहे. दीर्घकाळ तो त्या डबक्याच्या दलदलीत वास्तव्य करत असतो, पण कर्मधर्म संयोगाने तो त्या घाणीतून बाहेर पडतो तेंव्हा त्याला कळते की, आपले विश्व खूप मोठे आहे. पण आपण या मोठया विश्वात येण्याचा, गरीबीच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नच करीत नाही; आम्ही आमची गरिबी उराशी कवटाळून नशिबाला दोष देत अश्रू ढाळत राहतो, आमच्या डोळ्यातील अश्रुमुळे आम्हांला सारे काही अंधुक दिसते, परिणामतः आम्हांला गरीबीच्या दलदलीतून बाहेर येण्याचा मार्ग दिसत नाही. म्हणून गरिबीला न कवटाळता, डोळ्यातील अश्रू पुसून आम्ही नवा मार्ग शोधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवा.
मला अजून एक उदाहरण सांगावस वाटत. मी एका नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीत काम करीत असतांना एकदा एका व्यक्तीची भेट झाली, ती व्यक्ती काही वर्षापूर्वी एका हॉटेल मध्ये वेटर म्हणून महिना सात हजार रुपये पगारावर काम करत होती. ती व्यक्ती रोज हॉटेलमध्ये कामाला आल्यावर विचार करत असे की, एक ना एक दिवस मी महिन्याला पन्नास हजार रुपये पगार मिळवणारचं आणि एक दिवस तो एका नेटवर्क कंपनीत अर्धवेळ कामाला लागला, काही दिवसात त्याची चांगली टीम तयार झाली. आणि तो आठवडयाला पन्नास हजार रुपये कमवू लागला. म्हणजेच सदर इसमाचे उदाहरणावरून आम्ही आमच्या दैनंदिन कामकाजाबरोबरचं आमच्या गरीबीतून बाहेर पडण्याचा विचार करायला हवा, आणि केवळ आम्ही विचार करून चालणार नाही तर त्याला सकारात्मक कृतीची जोड द्यायला हवी.
लेखक - राज धुदाट यांचे “मी गरीब का आहे?” हे पुस्तक वाचकांच्या आयुष्याला कलाटणी देणारे एक क्रांतिकारी पुस्तक आहे यात तिळमात्र शंका नाही. हे पुस्तक वाचून वाचकांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकते, मी असेही म्हणेन या पुस्तकाच्या वाचनाने जर काही वाचकांची गरीबी दूर झाली आणि त्यांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडले तर लेखक - राज धुदाट यांचा हा पुस्तक लेखनाचा प्रपंच सार्थकी लागला असे होईल. केवळ काही वाचक नव्हे तर शेकडो आणि हजारो वाचकांच्या जीवनात या पुस्तकाच्या माध्यमातून क्रांती घडेल याची मला पूर्ण खात्री आहे.
लेखक - राज धुदाट यांनी वाचकांसाठी अनेक नवीन नवीन विषयावर अगणित पुस्तकांची निर्मिती करावी, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी आणि त्यांच्या या वेगळ्या प्रयत्नासाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!
- कवी रमेश शिवाजी इंगवले
09637370129
पुस्तकाचे नाव मी गरीब का आहे? लेखक राज धुदाट
प्रकाशक डॉ. सुनील पाटील प्रकाशन कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
ISBN 978 - 81 - 927074 - 3 - 3 आकार 1/8
पृष्ठे 156 (कव्हर सह) मुल्य 140/-
विषय प्रबोधनपर संपर्क 02322 225500, 9975873569 kavitasagarpublication@rediffmail.com