Friday, November 25, 2011

पुलंचे एक पत्र ...

पु लंच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकसत्तेने एक लेख प्रकाशित केला
होता ज्यामध्ये पु.ल. आणि सुनीताबाई यांच्या या देण्याच्या आनंदाचं अतिशय
निर्मळ विवरण स्वत: पु लंनी एका पत्रातून केलेलं आहे. या पत्रात पु लं
सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते
आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही
तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात
होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा
प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं.

त्याचंच हे उत्तर -

१० जुलै १९५७,
प्रिय चंदू

रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम
प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली
आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून
उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला
फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १०
हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार
केला – फक्त थकवा च उरला आहे का?

वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो
असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा
विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार
करणार आहे.

तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही
हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला
आहेस?

पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न
महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत
आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न
सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे,
असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा
प्रश्न सुचतो.

तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला
अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला
किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने
भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो.

पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर
विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं
आणि घोडे पेंड खाते ते इथेच.

तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका
मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख
वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण
त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं
असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे
नाही?

तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे.
पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस
का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात
फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.

तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता
स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण
तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण
पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती
इथे!

तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून
जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का
करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी
करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात.
त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग
आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या
विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले
आहे.



तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत
का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का
भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात
कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का
द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे
लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही.
हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल
म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका
एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला
दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच
अर्थ आणावालागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. 

जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. 
आणि मग जीवनाला अर्थ येतो.

हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली.
कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं
दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे,
अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा!
बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता
अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास
हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला
पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू
कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?

जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षेत्रात तू ऐस. वैमानिक
ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या
लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ
दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग
जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो.


तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स –
शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत
जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या
दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण
उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!

लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला
ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या
तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं
नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध
कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि
वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे.

तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक
आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified.

My dear boy, whose deaths are justifiable?

माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत
निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी
हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा?
त्याबद्दल लिहायला हवं का?

ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे.

जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात.

तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.

.

कळावे,


भाई.

Sunday, November 13, 2011

Top 8 Ayurvedic Herbs


Top 8 Ayurvedic Herbs
 
Click Here To Join

















Ayurveda is an ancient system of medicine used in India and other Eastern countries. 
Much like Traditional Chinese Medicine, the Ayurvedic approach is holistic, and looks to address the root cause of disease, as opposed to simply treating a list of symptoms.

Ayurvedic herbs are commonly used as foods or culinary spices, and help to restore balance to the body. In Ayurvedic terms, when disease is present, it is the result of an imbalance in one of the three doshas, or the body’s vital energy.
These are pitta (fire), vata (air) and kapha (water). Herbs and food alike are used as part of a therapeutic regimen which may also include yoga, meditation and cleansing techniques.
The following herbs are considered a few of the most important remedies in Ayurvedic medicine.
They can be commonly found in most natural health food stores and herbal markets. Remember holistic treatments such as herbs are meant to complement, and not replace medical care.
Talk to your health care practitioner before using herbs for medicinal purposes.
 
 
01. ASHWAGANDHA
Click Here To Join

















Although traditionally an Ayurvedic herb, ashwagandha is now commonly used in herbal medicine throughout the West. Also known as winter cherry, it is naturally antibacterial, anti-inflammatory, and has immune-boosting properties.
It is your first line of defense against cancer and other immune system-related diseases. It helps improve vitality and combat insomnia, cancer, arthritis and diabetes.
 
 
02. BOSWELLIA
Click Here To Join












Boswellia, known as Shallaki in Ayurveda, is an excellent pain remedy. It is naturally anti-inflammatory and analgesic. In the west it is called Frankincense, and has been used to treat both rheumatoid and osteoarthritis, gout, and general aches and pains. Studies have even shown that taking boswellia can alleviate arthritis pain in as little as 7 days without the harmful side effects of over-the-counter NSAIDs.
 
 
03. CORIANDER (CILANTRO)
Click Here To Join













Coriander, or dhanyaka as it is referred to in Ayurveda, is a common culinary spice in both Asian and Latin cuisine. The fresh leaves are called cilantro, while the ground seeds are called coriander. Both contain natural anti-inflammatory and analgesic properties.
The herb is used in Ayurveda to treat indigestion, irritable bowel syndrome, fevers, respiratory infections and allergies. It is also a natural chelating agent, and has been used to help remove heavy metals from the body.
 
 
04. GARLIC
Click Here To Join












Garlic is revered by both chefs and herbalists alike. The Ayurvedic name for the herb is Lasuna. It is a prolific bulb that is used for a number of purposes. It is naturally antiviral, antifungal and antibacterial. It has been shown to be effective against the common cold and flu, and help enhance immune function.
It is used in both holistic and conventional medical circles to protect against heart disease and lower cholesterol. Garlic is a must-have for the home medicine cabinet.
 
 
05. GINGER
Click Here To Join

















Ginger, or shunti, is another versatile herbal remedy that doubles as a cooking spice. The root, or rhizome, is used to treat anything from benign conditions such as indigestion and nausea to more serious chronic problems such as arthritis and migraines. It is easily made into and herbal tea and makes a great home remedy tohave on hand.
 
 
06. GYMNEMIA SYLVESTRE
Click Here To Join













Shardunikagurmar, or more commonly, gymnema, is one Ayurvedic herb which has undergone extensive study. It has been found to be effective in treating and preventing type II diabetes because it appears to help control blood sugar levels. It can be used as a natural sweetener, or taken in capsule form.
 
 
07. TRIPHALA (AMLA, BIBHITAKI AND HARITAKI)
Click Here To Join













Amla, bibhitaki and haritaki are actually three herbs used together exclusively in an Ayurvedic formula known as triphala.
Amla is used to treat digestive disorders such as indigestion, gas, constipation, colitis and ulcers.
Bibhitaki is likewise used to treat digestive disorders, including Chron’s disease, intestinal parasites and gall stones.
Haritaki is used specifically for constipation, but is also effective for hemorrhoids, dysentery and parasites or worms.
Together these three herbs make a powerful internal cleansing remedy. They help restore balance and improve regularity. However, they are used only on a period basis due to their cathartic effect.
 
 
 
08. TURMERIC
Click Here To Join


















Turmeric, or haridra, is the Indian spice which gives curry its golden color. It has been used in Ayurvedic medicine for thousands of years, but it has also been studied scientifically in modern day. It is naturally anti-inflammatory, antioxidant and helps strengthen the immune system.

It has been shown to be effective in treating arthritis, diabetes and even cancer. Keep this herb handy in the spice rack!

आहाराचे वेळापत्रक

आपण घेत असलेला आहार हा सामान्यपणे द्रवरूप आणि घनरूप अशा दोन प्रमुख प्रकारांत मोडतो. त्यामध्ये द्रवरूप आहार म्हणजे पाणी पिणे, दूध पिणे याबद्दल सविस्तर चर्चा आपण पूर्वी केलेली आहे. पण आपण घेत असलेल्या घनरूप आहाराच्या म्हणजेच नाश्ता (न्याहारी) आणि भोजन यांच्या वेळांबद्दल आपण आरोग्याचे नियम जाणून घेण्याचा या रुचिपालटमध्ये प्रयत्न करणार आहोत.
आधीचे पचल्यावर दुसरे खा
मुळात आपण दिवसभरात केव्हा खावे, असा प्रश्न अनेक जण विचारत असतात. हल्ली मधुमेह, हृदयविकार इ.चे प्रमाण वाढत चालले असल्याने त्या रुग्णांना आहाराचा एक तक्ताच तयार करून दिलेला असतो आणि त्यानुसार ही मंडळी आपली गुजराण करत असतात. पण मुळात असे विकारच होऊ नयेत म्हणून आपणच स्वयंशिस्त पहिल्यापासूनच आपल्या आहाराचे वेळापत्रक ठरवले आणि ते पाळले तर पुढे विचित्र रोगांच्या आहाराचे तक्ते बाळगण्याची वेळ आपल्यावर येणार नाही.
सकाळी उठल्याबरोबर काही जणांना भूक लागत असते, तर काहींना एक उपचार म्हणून न्याहारी घ्यायची असते. मुळात सकाळी रोज आपले पोट स्वच्छ झाल्याशिवाय आपण कोणताही आहार घेऊ नये. रात्रीचे खाल्लेले पचून मलविसर्जन झाल्यावर मग पुढचा आहार घ्यावा. एरवी दिवसादेखील आधीचे खाल्लेले पचल्याची जाणीव झाली, भूक लागली की मगच खावे.
जेवण पित्तकाली घ्या..
दिवसाचे जेवण आपण किती वाजता करावे? असाही प्रश्न आपल्याला भेडसावत असतो. दिवसात सकाळी १0 ते दुपारी २ हा पित्ताचा काळ म्हणून शास्त्राने सांगितला आहे. शरीरातील पचनक्रिया करण्याचे मुख्य कार्य पित्तदोषाचे असते. त्यामुळे सामान्यत: पित्तकाली भोजन करण्याची सवय ठेवावी. म्हणजे पचन योग्य आणि सुलभ पद्धतीने होते. मग ज्यांना शक्य असेल आणि भूक लागत असेल अशांनी सकाळी १0 च्या सुमारास काही न्याहारी घेण्यास हरकत नाही. आणि मग दुपारी १ ते २ या वेळात जेवण्याची सवय पक्की ठेवावी.
दोन खाण्यांमध्ये किमान तीन तास ठेवा
दिवसाच्या दोन खाण्यात आपण किमान तीन तास अंतर ठेवायला हवे. आणि सहा तासांपेक्षा अधिक वेळ आपण त्या दोन खाण्यात अंतर ठेवता कामा नये, हा शास्त्रादेश आपण पाळायला शिकले पाहिजे. याच दृष्टीने सकाळी १0 ला न्याहारी आणि दुपारी २ च्या आत जेवण, हे वेळापत्रक आरोग्यदायी ठरते.
खूप सकाळी जेवण नको!
कार्यालयात काम करणार्‍या अनेकांना सकाळी साडेआठ ते ९ च्या सुमारास जेवण करून बाहेर पडण्याची सवय असते. पण सकाळची वेळ ही कफदोषाची असल्याने या काळात खाल्लेले पचायला फारसे सुलभ नसते आणि आपल्या शरीराच्या घड्याळालाही ते हिताचे ठरत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींनी सकाळी थोडी न्याहारी करून डबा घेऊन जावे आणि पित्तकाळी ‘लंचटाईम’ पाळावा.
अध्यशन टाळा
अध्यशन याचा अर्थ पूर्वी खाल्लेले पचण्याआधीच नवीन आहार घेणे. यालाच व्यवहारात आपण अधाशीपणा म्हणतो. असे अध्यशन टाळणे हे प्रकृतीच्या दृष्टीने खूप आवश्यक असते. तसे केले नाही तर आपल्या पचनशक्तीवर ताण येतो. अजीर्णसारखे विकार उद्भवतात.
अधाशीपणाचे दुष्परिणाम
आपण दोन खाण्यात तीन तासांपेक्षा कमी अंतर सातत्याने ठेवले आणि पूर्वीचे पचण्याआधीच खाण्याची सवय ठेवली, तर त्याचे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, असे भारतीय वैद्यकशास्त्र सांगते. माधवनिदान हा ग्रंथ यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. अधाशीपणा केला तर त्यामुळे पुढील विकार आपल्याला संभवतात.
जुलाब होणे, अर्धशिशी (अर्धे डोके दुखणे), हृदयविकार, त्वचारोग, मूत्रकृच्छ (मूत्रप्रवृत्तीला त्रास होणे), रक्तप्रदर (स्त्रियांमध्ये खूप अंगावर जाणे), वेदना होणे.
वरील विविध दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण अध्यशन टाळले पाहिजे.
नोकरी करणार्‍या मंडळींना आपले वेळापत्रक पाळणे त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असली तर शक्य होईल. पण व्यावसायिक मंडळींमध्ये मात्र खाण्याच्या वेळा पाळण्यापेक्षा टाळण्याचीच वेळ बर्‍याचदा येते आणि मग त्याचेही आरोग्यावर होणारे घातक परिणाम भोगावे लागतात. विशेषत: ही मंडळी सकाळी काहीतरी खाऊन घराबाहेर पडली की मग दुपारी दोन, तीन, चार अशा वेळेस जेवण करतात. याने जेवण्याची वेळ टळते आणि मग त्यांना उपासमारही होते, पित्त भडकते, वायूही त्रास देतो, डोकेदुखी निर्माण होणे, वजनावर परिणाम होतो, चिडचिड होते, काही वेळा घरातील स्त्रियाही अशाच प्रकारे जेवण्याच्या वेळा (उगीचच) टाळतात. मग पुढे त्याचाही त्रास होतो तेव्हा शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपल्या रोजच्या आहाराच्या वेळा नीट सांभाळणे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे.

वैद्य विजय कुलकर्णी
[लोकमत १३/११/२०११ ]

Sunday, November 6, 2011

भयकंपन



















पाऊसभोळा गोंदणवेळा पानावरती बिल्वचुडा 
जन्मजान्हवी तुझ्याचकाठी कृष्णसखीचा भरे घडा 

आर्त करुणा देई वेणा जळभाराची रात्र नवी 
श्लोकातून आरण्य दाटले शाल भयाची मला हवी 

पाऊसगाणी जणू विराणी काचेवरती एक चरा 
उत्तररात्री भिजल्या गात्री श्वासामधला हले झरा 

वैराणाचे आरण्यरुदन आज तमाच्या नदीतिरी 
रक्तचांदणे दाटून आले भयकंपाच्या आज घरी 

अशी सावळी मल्हाराची धून भिजवते बिल्वचुडा 
कृष्णघनाचे बिंब दाटले आज ऋतुवर स्वप्नसडा 


~विश्वराज जोशी, कोल्हापूर 
महाराष्ट्र टाईम्स ६/११/२०११ 

केवळ माझा सह्यकडा -वसंत बापट















केवळ माझा सह्यकडा 
===============


भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा 
गौरीशंकर उभ्या जगाचा ,मनांत पूजिन रायगडा 
तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिंवरथडी 
प्यार मला हे कभिन्न कातळ , प्यार मला छाती निधडी 
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला 
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला 
धिक तुमचे स्वर्गही साती 
इथली चुंबिन मी माती 
या मातीचे कण लोहाचे ,तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजुनी वाहतसे लाव्हा सगळा
 
कबीर माझा, तुळसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच 
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो "एका " हृदयी एकवटे
जनाबाइच्या ओवी मध्ये माझी मजला खूण पटे 
इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली 
ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली 
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे 
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले 
माझ्यासाठी भीमाकांठी भावभक्तीची पेठ खुले

रामायण तर तुमचें माझें भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें 
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते 
हृदयाच्या हृदयांत परंतु बाजी बाजीची सुचते 
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी 
दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजुन हृदयामाजीं 
बच जाये तो और लढे 
पाउल राहील सदा पुढे 

तुम्हास तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा 
माझ्यासाठी राहिल गांठी मरहट्याचा हट्ट खरा 
तुमचेंमाझें ख्यालतराणे दोघे ऐकू गझला 
होनाजीची सोनलावणी वेड लावते परि मजला 
मृदुंग मोठा सुमधुर बोले,मंजुळ वीणा अन मुरली 
थाप डफावर कडकडतां परि बाही माझी फुरफुरली 
कडाडणारा बोल खडा जो दरी दरीमधुनी घुमला 
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला 
तटातटा तुटती बंद 
भिंवईवर चढते धुंद 
औट हात देहांत अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासशी धृढ नातें 

कळे मला काळाचे पाउल द्रुतवेगानें पुढती पडे 
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकची उघडे 
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी 
मीही माझें बाहू पसरून अवघ्या विश्वातें कवळी 
माझ्या घरची विशाल दारे, खुशाल हीं राहोत खुली 
मज गरीबाची कांबळवाकळ सकळासाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत 
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात 
कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत 


~वसंत बापट 
कविता सं
ग्रह -सेतू प्रथमावृत्ति मे १९५७