Monday, August 1, 2011

१५० निवडक मराठी पुस्तकांची यादी

१५० निवडक मराठी पुस्तकांची यादी
'महाराष्ट्र टाईम्स'ने आपल्या २९ जून १९८६च्या अंकात १५० निवडक मराठी पुस्तकांची यादी 'सर्वोत्कृष्ट/नावाजलेली' म्हणून प्रसिद्ध केली. या पुस्तकांची निवड 'महाराष्ट्र टाईम्स'ने स्वत:च केली होती.
१. लीळाचरित्र / श्री चक्रधरस्वामी 
२. नामदेवाचे अभंग / संत नामदेव 
३. ज्ञानेश्वरी / संत ज्ञानेश्वर 
४. एकनाथांची भारुडे / संत एकनाथ 
५. श्री तुकाराम गाथा / संत तुकाराम 
६. श्रीदासबोध / समर्थ रामदास 
७. नवनीत / प्रशुराम बल्लाळ गोडबोले 
८. यमुनापर्यटन / बाबा पदमजी 
९. वेदोक्तधर्मप्रकाश / विष्णुबाबा धर्मचारी 
१०. आज्ञापत्र / रामचंद्रपंत अमात्य बावडेकर 
११. थोरले माधवराव पेशवे / विनायक जनार्दन किर्तने 
१२. मुंबईचे वर्णन / गोविंद नारायण माडगावकर 
१३. लोकहितवादींची शतपत्रे / गोपाळ हरी देशमुख 
१४. मोचनगड / रामचंद्र भिकाजी गुंजीकर 
१५. शेतकर्‍याचा आसूड / महात्मा ज्योतीराव फुले 
१६. संगीत सौभद्र / अण्णासाहेब किर्लोस्कर 
१७. निबंधमाला / विष्णुशास्त्री चिपळूणकर 
१८. रामजोशीकृत लावण्या / रांजोशी 
१९. भाऊसाहेबांची बखर / कृष्णाजी शामराव 
२०. ज्योतिर्विलास अथवा रात्रीची दोन घटका मौज / शंकर बाळकृष्ण दीक्षित
२१. पण लक्षात कोण घेतो / हरी नारायण आपटे
२२. वाईकर भटजी / धनुर्धारी (रा. वि. टिकेकर)
२३. संगीत शारदा / गोविंद बल्लाळ देवल
२४. काळ पत्रातील निवडक निबंध / शिवराम महादेव परांजपे
२५. भक्तीमार्गप्रदीप / ल. रा. पांगारकर
२६. माझा प्रवास अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकिगत / विष्णूभट गोडसे
२७. आमच्या आयुष्यातील काही आठवणी / रमाबाई रानडे
२८. कीचकवध / कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर
२९. सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे / श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
३०. आर्याभारत / मोरोपंत पराडकर
३१. दुर्दैवी रंगू अथवा पानिपतचा शेवटचा संग्राम / चिंतामण विनायक वैद्य
३२. टिळकांची कविता / रेव्ह. नारायण वा. टिळक
३३. गावगाडा / त्रिंबक नारायण आत्रे
३४. आत्मवृत्त / ढोंडो केशव कर्वे
३५. रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद / वा. म. जोशी
३६. केशवसुत यांची कविता / केशवसुत (कझ्ड. के. दामले)
३७. मराठी व इंग्रज : मराठेशाहीचे शतसांवत्सरिक वाण्गमयश्राद्ध / न. चिं. केळकर
३८. श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर - उपसंहार / चि. वि. वैद्य
३९. महाराष्ट्र सारस्वत / विनायक लक्ष्मण भावे
४०. एकच प्याला / राम गणेश गडकरी

४१. तांबे यांची समग्र कविता / भा. रा. तांबे
४२. वाग्वैजयंती / गोविंदाग्रज ( रा. ग. गडकरी)
४३. लो. टिळकांचे केसरीतील लेख / बाळ गंगाधर टिळक
४४. सगनभाऊकृत लावण्या व पोवाडे / गो. गो. अधिकारी
४५. निवेदन / धर्मानंद कोसंबी
४६. शिवछत्रपती यांची सभासद बखर / कृष्णाजी अनंत
४७. राजा शिवाजी नावाची वीररसप्रधान कविता / म. मो. कुंटे
४८. झेंडूची फुले / केशवकुमार (आचार्य अत्रे)
४९. विरहतरंग / माधव ज्युलीयन (माधव त्रं. पटवर्धन)
५०. रणदुंदुभी / वामनराव जोशी
५१. माझे रामायण / दत्तो अप्पाजी तुळजापूरकर
५२. माही जन्मठेप / विनायक दामोदर सावरकर
५३. लोकमान्य टिळक यांचे चरित्र / न. चिं. केळकर
५४. दौलत / ना. सी. फडके
५५. स्वातंत्रयशाहीर कवी गोविंद यांची कविता / गोविंद त्रंबक दरेकर
५६. पोपटपंची / जयकृष्ण केशव उपाध्ये
५७. ब्राह्मणकन्या / ह्रीधर व्यंकटेश केतकर
५८. फुलवात / अनिल (आत्माराम रावजी धेशपांडे)
५९. गुजगोष्टी / ना. सी. फडके
६०. धावता धोटा / भा. वि. वरेरकर
६१. कळयांचे नि:श्वास / विभावरी शिरूरकर (मालतीबाई बेडेकर)
६२. मुक्तात्मा / ग. त्रं. माडखोलकर
६३. चिमणरावांचे चर्‍हाट / चिं. वि. जोशी
६४. दिवाकरांच्या नाटयछटा / शंकर काशीनाथ गर्गे
६५. आंधळयांची शाळा / श्रीधर विनायक वर्तक
६६. दोन धृव / वि. स. खांडेकर
६७. स्मृतीचित्रे / लक्ष्मीबाई टिळक
६८. कालिदास / वा. वि. मिराशी
६९. घराबाहेर / आचार्य अत्रे
७०. फुलांची ओंजळ / बी (नारायण मुरलीधर गुप्ते)
७१. श्यामची आई / सानेगुरुजी
७२. आजकालचा महाराष्ट्र / प्रभाकर पाध्ये
७३. संपूर्ण आगरकर निबंधसंग्रह / गोपाळ गणेश आगरकर
७४. आधुनिक भारत / आचार्य शं. बा. जावडेकर
७५. अर्धचंद्र / पंडित सप्रे
७६. लोकसता अर्थात भारतवर्षातील नद्यांचे वर्णन / काका कालेलकर
७७. रणांगण / विश्राम बेडेकर
७८. पाणकळा / र. वा. दिघे
७९. माझा संगीत व्यासंग / गोविंदराव टेंबे
८०. काही म्हातारे व एक म्हातारी / वि. द. घाटे

८१. माझ्या आठवणी व अनुभव / कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
८२. धुक्यातून लाल तार्‍याकडे / अनंत काणेकर
८३. उपेक्षितांचे अंतरंग / श्री. म. माटे
८४. आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास / ऋग्वेदी (वामन मं. दुभाषी)
८५. कुलवधू / मो. ग. रांगणेकर
८६. बालकवींची समग्र कविता / बालकवी (त्रंबक बापूजी ठोमरे)
८७. विशाखा / कुसुमागज्र (वि. वा. शिरवाडकर)
८८. गीता प्रवचने / विनोभा भावे
८९. काही कविता / बा. सी. मर्ढेकर
९०. दूधसागर / बा. भ. बोरकर
९१. रावबहादूर दादोबा पांडुरंग - आत्मचरित्र व चरित्र / अनंत काकबा प्रियोळकर
९२. माणदेशी माणसं / व्यंकटेश माडगूळकर
९३. सतरावे वर्ष / पु. भा. भावे
९४. नवी मळवट / शरच्चंद्र मुक्तिबोध
९५. बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे जीवनवृत्त व लेखनसंग्रह / ग. गं. जांभेकर
९६. संतवाण्गमयाची सामाजिक फलश्रुती / गं. बा. सरदार
९७. वैदिक संस्कृतीचा विकास / लक्ष्मणशास्त्री जोशी
९८. कमळण / अरविंद गोखले
९९. बहिणाबाईची गाणी / बहिणाबाई
१००. गारंबीचा बापू / श्री. ना. पेंडसे
१०१. शीळ / ना. घ. देशपांडे
१०२. मृदगंध / विंदा करंदीकर
१०३. तलावातील चांदणे / गंगाधर गाडगीळ
१०४. पडघवली / गो. नी. दांडेकर
१०५. मेंदी / इंदिरा संत
१०६. शेवग्याच्या शेंगा / य. गो. जोशी
१०७. श्रीमंत / विजर तेंडुलकर
१०८. ऋतुचक्र / दुर्गा भागवत
१०९. गीतरामायण / ग. दि. माडगूळकर
११०. बहुरूपी / चिंतामणराव कोल्हटकर
१११. पंडितराज जगन्नाथ / विद्याधर गोखले
११२. धग / उद्धव ज. शेळके
११३. देव चालले / दि. बा. मोकाशी
११४. अनामिकाची चिंतनिका / पु. य. देशपांडे
११५. पानिपत १७६१ / त्रं. ज. शेजवलकर
११६. सावित्री / पु. शि. रेगे
११७. व्यक्ती आणि वल्ली / पु. ल. देशपांडे
११८. रायगडाला जेव्हा जाग येते / वसंत कानेटकर
११९. कोसला / भालचंद्र नेमाडे
१२०. स्वामी / रणजित देसाई

१२१. माझ्या आठवणी / पांडुरंग चिमणाजी पाटील
१२२. चक्र / जयवंत दळवी
१२३. भारताचे शिल्पकार - वालचंद्र हिराचंद्र यांचे चरित्र / गं. दे. खानोलकर
१२४. मराठयांच्या सत्तेचा उत्कर्ष / महादेव गोविंद रानडे
१२५. एक शून्य बाजीराव / चिं. त्रयं. खानोलकर
१२६. माझे विद्यापीठ / नारायण सुर्वे
१२७. बटाटयाची चाळ / पु. ल. देशपांडे
१२८. आदर्श भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले / न. र. फाटक
१२९. रानातल्या कविता / ना. धों. महानोर
१३०. संध्याकाळच्या कविता / ग्रेस
१३१. युगांत / इरावती कर्वे
१३२. महात्मा ज्योतीराव फुले / धनंजय कीर
१३३. निवडक ठणठणपाळ / जयवंत दळवी
१३४. समाधी व इतर सहा गोष्टी / दिवाकर कृष्ण केळकर
१३५. जेव्हा माणूस जागा होतो / गोदावरी परुळेकर
१३६. रामनगरी / राम नगरकर
१३७. नटसम्राट / वि. वा. शिरवाडकर
१३८. गोतावळा / आनंद यादव
१३९. धार आणि काठ / नरहर कुरुंदकर
१४०. काजळमाया / जी. एअ. कुलकर्नी
१४१. रंग माझा वेगळा /सुरेश भट
१४२. शूद्र पूर्वी कोण होते? / बाबासाहेब आंबेडकर
१४३. नक्षत्रांचे देणे / आरती प्रभू (चिं. त्रं. खानोलकर)
१४४. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास / वि. का. राजवाडे
१४५. बलुतं / दया पवार
१४६. आठवणींचे पक्षी / प्र. ई. सोनकांबळे
१४७. यक्षांची देणगी / जयंत नारळीकर
१४८. उपरा / लक्ष्मण माने
१४९. एका जन्मातल्या गाठी / शरच्चंद्र वासुदेव चिरमुले
१५०. संवाद / विजया राजाध्यक्ष



वाचकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन २७ पुस्तकांची या यादीत नंतर भर घालण्यात आली. 

१. गीतारहस्य / बाळ गंगाधर टिळक
२. वीरधवल / नाथमाधव (द्वारकानाथ माधव पितळे)
३. न पटणारी गोष्ट / नारायण हरी आपटे
४. यशोधन / कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढारकर)
५. गीताई / आचार्य विनोबा भावे
६. प्रतिभा-साधन / ना. सी. फडके
७. दाजी / ना. धों. ताम्हणकर
८. मखमलीचा पडदा / वसंत शांताराम देसाई
९. विज्ञानबोधाची प्रस्तावना / श्री. म. माटे
१०. मी कसा झालो? / आचार्य अत्रे
११. अठराशे सत्तावनचे स्वातंत्रयसमर / वि. दा. सावरकर
१२. बनगरवाडी / व्यंकटेश माडगूळकर
१३. राजा शिवछत्रपती / ब. मो. पुरंदरे
१४. ययाती / वि. स. खांडेकर
१५. जिप्सी / मंगेश पाडगावकर
१६. संस्कृती-संगम / द. के. केळकर
१७. व्यासपर्व / दुर्गा भागवत
१८. शामराई / शामराव ओक
१९. पोत / द. ग. गोडसे
२०. पथिक / न. वि. गाडगीळ
२१. आनंदी गोपाळ / श्री. ज. जोशी
२२. युद्ध-नेतृत्व / दि. वी. गोखले
२३. श्रीमान योगी / रणजित देसाई
२४. मुंबई, दिनांक ... / अरुण साधू
२५. सांगते ऐका / हंसा वाडकर
२६. शोध बाळ-गोपाळांचा / य. दि. फडके
२७. महाराष्ट्र संस्कृती / पु. ग. सहस्रबुद्धे

हि यादि तयार करणारे संपादक मंडळात खालील सदस्य होते
१. श्री. गोविंद तळवलकर
२. श्री. पु. ल . देशपांडे
३. श्री. अरुण टिकेकर
४. श्री. अरुण आठल्ये
हि माहिती जुने जुलै २०११ च्या " लोकराज्य" अकांत प्रसिद्ध  
झाली आहे .
'मराठीतील साहित्यलेणी' या शिर्षकाखाली दीपक घारे यांनी संकलित केलेली ही यादी 'ग्रंथाली'तर्फे २५ ऑक्टोबर १९८६ रोजी एका पुस्तिकेच्या रुपात प्रकाशित झाली आहे.

No comments:

Post a Comment